विठ्ठल माझे आराध्य दैवत. त्याची सेवा अहर्निश करतो. तो माझा सखा आहे. प्रेम आहे. माझ्या मनातील सौंदर्य देखील तोच आहे. तो माझा श्वास आहे, प्रतिश्वास आहे. त्याच्या कृपेने मी जीवन जगत आहे. मी मोठा संत महंत नाही. किंवा माझी ती योग्यताही नाही. पण माझा आहे भोळा भाव. त्याचभावनेने मी त्याची उपासना करतो. तो माझा मार्गदर्शक आहे. मी त्याच्या भक्तित रममाण होतो त्यावेळेस काही विचार काव्य रुपाने प्रगट होतात ते मी कागदावर लिहुन ठेवतो, त्याचाच हा संग्रह आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा